राज्य सरकारतर्फे बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा किटचे उद्या मंगळवार दि. 17 सप्टेंबरपासून कामगार भवन कामगार खाते मजगाव येथे वाटप केले जाणार आहे. तरी किट स्वीकारण्यासाठी बांधकाम व असंघटित कामगारांनी कामगार कार्ड व आधार कार्डची प्रत घेऊन संबंधित आणि उपस्थित रहावे, असे आवाहन सुजाण भारत कामगार युनियन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
कामगारांना देण्यात येणारा कोरोना निधी, लग्न कार्याची रक्कम, निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती वेतन, वैद्यकीय उपचार, मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना मदत निधी, महिला कामगार गर्भवतींना मदत, एलपीजी गॅस कनेक्शन आदींबाबत तक्रार असल्यास राज्य सरकारतर्फे येत्या मंगळवार दि. 14 व बुधवार दि. 15 सप्टेंबर रोजी कार्मिक भवन मजगाव येथे लोकअदालत होणार आहे. याचीही सर्वांनी नोंद घेऊन लोक अदलतीला उपस्थित राहून अडचणी मांडाव्यात, असेही कळविण्यात आले आहे.