2 ऑक्टोबर गांधी जयंती पर्यंत कर्नाटक राज्यातील मराठा समाजाचा 2 अ मध्ये समाविष्ट करण्यात यावा,आणि मराठा प्राधिकार निगम मंडळ कार्यान्वितहोण्यासह श्रीमंत पाटील यांची सध्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्रीपदी नियुक्ती करावी अन्यथा 3 ऑक्टोबर पासून एकाच वेळी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा कर्नाटक सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
बेळगाव जिल्ह्यातील कित्तुर येथे रविवारी राज्यातील मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला, राज्यातील अनेक जिल्ह्यातून दोन हजारहुन अधिक मराठा जिल्हा समन्वयक उपस्थित होते.औरंगाबाद महाराष्ट्र येथून मराठा समाजाचे अंकश चव्हाण यांची खास उपस्थिती होती.
आमदार माजी मंत्री श्रीमंत पाटील,आमदार अंजली निंबाळकर, भाजप नेते किरण जाधव,यशवंत जाधव दावणगेरे, डॉ सोनाली सरनोबत,सीमा पवार,शहाजीराजे ट्रष्ट होदीगेरेचे मल्लेशी, बिदर येथून नारायण गणेश आदी उपस्थित होते.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात श्रीमंत पाटील यांचा समाविष्ट व्हावा अशी मागणी या अगोदर देखील समाज म्हणून केलेली आहे.काँग्रेसच्या आमदार असलो तरीही समाज म्हणून यासाठी मी आग्रही आहे. असे मत खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कर्नाटक राज्यातील मराठा समाजातील एकत्रीकरणाने सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. कर्नाटकात एकूण 66 लाख मराठा बांधव आहेत. आजवर दुर्लक्षित राहिलेला मराठा समाज संघटितपणे समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्यामुळे. एकंदर कर्नाटक प्रदेशातील मराठा समाजात नवे चैतन्य निर्माण झाले आहे.