संपूर्ण कर्नाटकात यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव पाच दिवसाचा होत असताना बेळगावात अकरा दिवस गणेशोत्सव करण्यासाठी परवानगी मिळणार आहे .सरकारने यासंदर्भात तयारी सुरू केली असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आज ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
सुरुवातीपासूनच बेळगाव शहरातील लोकमान्य गणेशोत्सव महामंडळ आणि मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळातर्फे वारंवार विनंती आणि सूचना करण्यात आल्या. सर्व प्रकारचे नियम पाळण्यास आम्ही तयार आहोत. गणेश उत्सव अकरा दिवसांचा करण्याची परवानगी द्या. अशी विनंती करण्यात येत होती.
त्या विनंतीला मान देऊन सरकारने 11 दिवसाची परवानगी देण्याची तयारी सुरू केली असून आज ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे. बेळगावच्या गणेशोत्सवाला पारंपारिक महत्त्व आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात बेळगावचा गणेशोत्सव प्रसिद्ध मानला जातो. या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे मागील वर्षी गणेशोत्सवाचे स्वरूप काही प्रमाणात कमी करावे लागले होते. यावर्षी मात्र अकरा दिवसांचा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा होऊ शकेल. अशी शक्यता निर्माण झाली आहे.