बेळगाव जिल्ह्यात आज रविवार दि. 19 सप्टेंबर रोजी नव्याने 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर आज आणखी चौघाजणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 313 झाली आहे. तसेच कोरोनाबाधित चौघांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या एकुण 911 झाली आहे. उपचारांती बरे झाल्यामुळे आज 13 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या सात दिवसातील जिल्ह्यामधील पॉझिटिव्हिटीचा रेट शेकडा -0.33 टक्के इतका होता. आज रविवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 882 जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आज नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 8, चिकोडी 2, गोकाक 3, हुक्केरी 1 आणि इतर 1 अशा एकूण 15 रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात एका दिवशी सर्वाधिक 2234 रुग्णांची नोंद गेल्या 19 मे 2021 रोजी झाली होती. त्याचप्रमाणे 1 जून 2021 या एका दिवशी सर्वाधिक 4270 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.