बेळगावची प्रत्येक गल्ली म्हणजे सीमाप्रश्नाचा बालेकिल्ला आहे. सीमा भागातील या बालेकिल्ला मध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी जाताना वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत.
शहापुरच्या कोरे गल्ली येथील नागरिकांनी आपल्या घरावर भगवा ध्वज फडकावून त्यानंतर मतदानाला जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे संपूर्ण गल्ली भगवी झाली आहे.
येथील नागरिकांनी पहाटेपासूनच आपल्या घरावर भगवा ध्वज लावण्यास सुरवात केली. भगवा लावल्यानंतर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी उचललेले पाऊल सगळीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले, यामुळे कोरे गल्ली येथील नागरिकांचा आदर्श सर्वत्र घेतला जात असून निवडणुकीचे वातावरण यामुळे भगवेमय होऊ लागले आहे.
महानगरपालिका निवडणुकीला सकाळ पासून सुरुवात झाली असून सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे .मोठ्या संख्येने मतदानासाठी नागरिक बाहेर पडत आहेत. ठीक ठिकाणी निवडणुकीसाठी उभारलेल्या उमेदवारांनी ही सर्वप्रथम मतदान करण्याचा आपला हक्क बजावला असून निवडणुकीला रंग चढू लागला आहे