Thursday, December 26, 2024

/

न्यायालय आवारात पत्नीवर हल्ला

 belgaum

बैलहोंगल येथील दिवाणी न्यायालय आवारात संतप्त पतीने धारदार शस्त्राने आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करून तिचा पायाच तोडल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी घडली.

हल्लेखोर पती हा सेवानिवृत्त जवान असून त्याचे नांव शिवाप्पा अडकी असे आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नांव जयमाला शिवप्‍पा अडकी असे आहे.

शिवाप्पाचे 11 वर्षांपूर्वी वरुर (जि. धारवाड) गावातील जयमालाशी विवाह झाला होता. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींसंदर्भात उभयतांमध्ये न्यायालयात वाद सुरू आहे.Crime news logo

दोघांमधील वादासंदर्भात आज बैलहोंगल दिवाणी न्यायालयात सुनावणी झाली. याप्रसंगी न्यायालय आवारात शिवाप्पाने जयमालावर धारदार शस्त्राने हल्ला करून संतापाच्या भरात तिचा पाय तोडला.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयमाला हिला उच्चारासाठी बेळगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बैलहोंगल पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.