बेलगाम चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत(व्यापार क्षेत्रात) डेवलोपमेंट पॅनलच्या पाच उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. बेळगाव चेंबरऑफ कॉमर्सच्या संचालक मंडळ 2021साठी सोमवारी दुपारी 3 वाजे पर्यंत गुडस शेड रोड येथे मतदान झाले होते. चेंबरच्या उद्यमबाग औद्योगिक क्षेत्रात बिन विरोध निवड झाली आहे त्यामुळे केवळ (trade व्यापार) विभागातील पाच जागांसाठी निवडणूक झाली.
डेवलोपमेंट आणि प्रगती पॅनेलच्या पाच पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. एकूण 1308 मतदान होते दुपारी 3 वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण होताच मतमोजणी झाली.
या निवडणुकीत डेवलोपमेंट पॅनलचे भुपेंद्र पटेल यांना 427,मनोज मतीकोप्प यांना 438 मते ,प्रशांत कळळीमनी यांना 402,संजीव कत्तीशेट्टी यांना 455 मते,स्वप्नील शाह यांना 397 मते मिळवून यांनी विजय मिळवला.
तर सतीश गोरगोंडा यांना 242,सोमशेखर चोन्नद याना 214, सतीश चौगुला याना 172 तर सतीश पाटील यांना 196 आणि वेंकटेश शहापूरकर याना 170 मते पडली.