Tuesday, January 21, 2025

/

बासमती,मसूर देऊन मागणी बायपास रद्द करण्याची

 belgaum

अलारवाड ते मच्छे या दरम्यान संपूर्ण जमीन तिबार पिकांची आहे.यामुळे येथे बायपास रस्ता करू नका अशी मागणी शेतकऱ्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली.
आपल्या भूमातेच्या संरक्षणासाठी याच भूमीत पिकवण्यात आलेले बासमती तांदूळ आणि मसूर मुख्यमंत्र्यांना भेटी दाखल देण्यात आले.

बायपास विरोधातील लढा अनेक काळ सुरू आहे. या लढ्यात न्यायालयीन मार्गाचीही निवड शेतकऱ्यांनी केली आहे. तरीही हा प्रकल्प रद्द न करता वारंवार तो पुढे सरकावण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यात आली.

Farmers Rice to cm
या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या आणि आमच्या जमिनी सुरक्षित ठेवा अशी मागणी करण्यात आली.बेळगावच्या शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांकडे भेट मागितली होती त्यांना चर्चेसाठी भेट मिळत नव्हती

मात्र अखेर शासकीय विश्रामगृहात त्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली त्यावेळी हलगा मच्छे बायपास सुपीक जमिनीत येणारी तिबारी पिके दाखवत जमीन संपादित करू नये अशी मागणी केली.Bommai

हिवाळी अधिवेशन सुवर्णविधानसौध मध्ये: मुख्यमंत्री बोम्मई

मी बेळगावात साखर संचालनालय कार्यालय उघडण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले की साखर संचालनालय 3 ऑक्टोबरपासून बेळगावात कार्यान्वित होईल.

बेळगाव येथे शेतकऱ्यांशी भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सुवर्णविधानसौध मध्ये कोणती कार्यालये उघडली पाहिजेत याचे नियोजन केले आहे. हे काम डिसेंबरमध्ये सुरू केले जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या राज्य दौऱ्याला हायकमांडने रोखल्याबद्दल प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की येडियुरप्पा यांना प्रवास दौरा करण्यात कोणतीही अडचण करण्यात आली नव्हती आणि त्याबद्दल ते आणखी जास्त काही बोलले नाहीत.

शेतकरी नेते राजू मरवे यांचे मत

अन मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांप्रती आत्मियता प्रकटली*

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीशासकीय विश्रामधामवर शेतकऱ्यांसह इतर जनतेच्या समस्या शांतपणे जाणून घेतल्या.पण अनेक शेतकरी संघटनांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी निवेदनासह नेते मोजक्या शेतकऱ्यांना घेऊन सकाळीच विश्रामधाम गाठले.पण पोलीस खात्याने अनेकांची अडवणूक करत परवानगी शिवाय आत सोडणार नाही असा पवित्रा घेतल्याने शेतकऱ्यांनी गेटसमोरच मोठमोठ्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. टी व्ही माध्यमाचे पत्रकार लगेच धाऊन आले आणि शेतकऱ्यांच्या घोषणाचे थेट लाईव सुरु केले.ते समजताच सरकारी अधिकारी खडबडून जागे झाले व पोलिसखात्याला सांगून घोषणा देणारे मोजके शेतकरी व नेत्यांना आत सोडले. पोलीस अधिकाऱ्यांबरोबर थोडी बाचाबाची झाली.पण नंतर सर्व शांत झाले.
सर्किट हाऊस मध्ये आत गेल्यावर मुख्यमंत्री आधी घोषणा देणारे शेतकरी तसेच जनतेच्या समस्या जानून सगळ्यांची निवेदन स्विकारली.अनेक शेतकरी आतच तटकळात उभे होते.पण मुख्यमंत्री बाहेर पत्रकारनां मुलाखत देण्यासाठी गेले होते ते शेतकऱ्यांना न समजल्याने मुख्यमंत्री निघालेतच असे समजून शेतकऱ्यांनी पुन्हा घोषणा दिल्या.तेवढ्यात मा जिल्हाधिकारी येऊन परत मुख्यमंत्री साहेब येऊन आपल्याला भेटणार आहेत म्हणून सांगितल्यावर शांत झाले.त्यानंतर मुख्यमंत्री येऊन एका हॉलमधे शेतकऱ्यांना बसवून त्यांचीही निवेदनं घेत शांतपणे म्हणने ऐकून घेत होते.एक शेतकरी नेता मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन आपली वेगवेगळ्या समस्यावरील एकेक निवेदनं देऊन सागंत असतानां मुख्यमंत्री शांतपणे ते ऐकून घेत होते.पण एक बिनड्रेस पोलीस त्यांचा हात धरुन आता बस करा बस करा म्हणून सांगतानां ते मुख्यमंत्र्यांनी पाहिलं त्याच क्षणी त्या पोलिसाला सुनावल कि तुम्ही गप्प रहा ते आपल्या समस्या शांतपणे माझ्याकडे सांगताहेत तेंव्हा तुम्ही कृपया ईथून बाहेर जा म्हणून सांगितल्याने प्रत्येक शेतकऱ्यांना समाधान झाले की मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांप्रती खरोखरच आत्मियता आहे याची प्रत्येकाला प्रचिती आली.पण आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढून न्याय देतील तेव्हाच माननिय मुख्यमंत्र्यांप्रती शेतकऱ्यात आत्मिक समाधान होईल हे मात्र नक्की.

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.