बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ एस पी एम रोड इथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविंद्र कौशिक ई वाचनालयाचे उदघाटन केलं.शनिवारी दुपारी पासून मुख्यमंत्री बेळगाव दौऱ्यावर आहेत.
2.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या लायब्ररीमध्ये कन्नड, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू अशा पाच भाषेतील डिजिटल ग्रंथालय उपलब्ध आहे.
सदर ई-लायब्ररीसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी एकूण 23 डेस्कटॉप कॉम्प्युटर्स आहेत.
लहान मुलांसाठी पाच टेबलेट्स उपलब्ध आहेत. मुलांचा प्रतिसाद पाहून येथील टेबलेट्सची संख्या वाढवण्यात येईल. या लायब्ररीत सुमारे 5 हजार पुस्तके उपलब्ध आहेत आणि अगणित वाचक आपल्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरवर पुस्तकं डाऊनलोड करून घेऊ शकतात. या लायब्ररीतील पुस्तके बेळगाव स्मार्ट सिटी ई-लायब्ररी एप्लीकेशनद्वारे देखील उपलब्ध होतील. मात्र सबस्क्राईब करण्यासाठी 50 ते 60 रुपये खर्च येणार आहे.
सदर ई-लायब्ररीसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी एकूण 23 डेस्कटॉप कॉम्प्युटर्स आहेत.
लहान मुलांच्या पुस्तकासह येथे स्पर्धात्मक परीक्षेची पुस्तके आणि सर्व वयोगटातील प्रौढांसाठी पुस्तके येथे उपलब्ध असतील, असे ई -लायब्ररीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास के. यांनी स्पष्ट केले.
या लायब्ररीत वायफाय सुविधा उपलब्ध असून लायब्ररीच्या 300 मीटर परिघात वाचकांना पुस्तके वाचता येतील. मात्र ही सुविधा फक्त वाचन आणि डाऊनलोडसाठी वापरता येईल. सदर तीन मजली लायब्ररीत एकाच वेळेस 60 वाचकांची सोय होऊ शकते, असेही श्रीनिवास यांनी सांगितले.