बेपत्ता बालक नेमके कुठे गेले याचा शोध सुरू असताना ते बोअरवेलमध्ये घसरून पडल्याची माहिती मिळाली होती मात्र बचावकार्य सुरू झाल्यानंतर त्या बालकाचा अपघाती मृत्यू नसून खून झाल्याची माहिती उघड झाली आहे.
रायबाग तालुक्यातील दोन वर्षांच्या बालकाच्या बेपत्ता प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.ते बालक एका धोकादायक बोअरवेल मध्ये पडले होते. त्याला बाहेर काढण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असताना त्याच्या पित्यानेच त्याचा खून केल्याची माहिती बाहेर आल्याने संताप व्यक्त होत आहे .
रायबाग तालुक्यातील अलकनूर गावात परवा बेपत्ता झालेले दोन वर्षांचे मूल काळ संध्याकाळी बोअरवेल मध्ये मृत अवस्थेत आढळले.
शेतातील घरासमोर खेळत असताना अलकनुर गावात शरथ सिद्दप्पा हजारे या 2 वर्षीय मुलाच्या बेपत्ता झाल्याबद्दल पालकांनी हरूगेरी स्थानकात तक्रार दाखल केली होती. घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावर असलेल्या बोअरवेलमध्ये 15 ते 20 फूट खोल ते बालक पडले असल्याचे आढळून आले.
फार्महाऊसच्या शेजारी असलेल्या बोअरवेलमधून मृतदेह काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
वडिलांवर त्याच्या दोन वर्षांच्या मुलाचा, शारथाचा खून केल्याचा आरोप आहे.
मुलाच्या आजी सरस्वतीने आरोप केला की वडिलांनी.फार्म हाऊसजवळील बोअरवेलला मुलाचे पाय बांधले होते.
मुलाचा मृतदेह बोअरवेलमधून काढण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. पोलीस मुलाच्या मृत्यूचा सर्व शक्यतांचा तपास करत आहेत.मुलाच्या वडिलांनी सिद्धप्पाने खून केला आहे की नाही याची पोलिस खात्री पटविण्यात पोलीस गुंतले आहेत.