बेळगाव शहरात महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत नागरिक मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत असून मतदान करण्याबद्दलचा उत्साह दिसून येऊ लागला आहे.
सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या गर्दीत वाढ होऊ लागली आहे.लोक अस्मितेने मतदान करण्यासाठी दाखल होत आहेत.
मोठ्या प्रमाणात मतदानासाठी दाखल होणाऱ्या मतदारांकडे पाहता यावेळी महानगरपालिकेतील मतदानाचा टक्का वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे .
बेळगाव शहरात सर्व भाषिक लोक राहतात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. यावेळी जास्तीत जास्त उमेदवारांनी या निवडणुकीत सहभाग घेतला असून समिती उमेदवार तसेच पक्षीय चिन्हांवर उभे असलेले उमेदवार यांच्यासाठी निवडणुकीत चुरस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
मतदानाची संख्या दुपारी काही प्रमाणात कमी होणार असली तरी सायंकाळनंतर पुन्हा मतदान करण्यासाठी लोक दाखल होणार आहेत. महिला वर्गाने घरातील कामे आटोपून दुपारनंतर मतदानासाठी येणे पसंत केले असल्याचे दिसून येत आहे.