बेळगाव महानगरपालिका निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शहरातील सर्व सरकारी कार्यालय आणि शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमाठ यांनी ही घोषणा केली असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही केले आहे. बेळगाव महापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे.
या दिवशी सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अनुदानित शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच खाजगी संस्था, उद्योगधंदे आणि खाजगी कंपन्यांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
वेतनासहित संबंधित सर्वांना रजा देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आपत्कालीन तातडीच्या सेवेशी संबंधित असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी मतदान करून पुन्हा कामावर हजर रहावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.