Saturday, November 16, 2024

/

भाजपची कूच क्लिनस्वीप कडे

 belgaum

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपची कुच एक हाती सत्ता मिळवण्याकडे होऊ लागली आहे. बहुतांश वॉर्डामध्ये भाजपचे उमेदवार निवडून येऊ लागल्यामुळे भाजप क्लीनस्वीप कडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी महानगरपालिका निवडणूक सर्वप्रथम पक्षीय तिकिटावर झाली. महाराष्ट्र एकीकरण समिती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप आणि इतर पक्ष अशा पद्धतीने झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा धक्कादायक रित्या पराभव होत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्या विजयाची शक्यता शंभर टक्के होती असे मराठी आणि समितीचे उमेदवार निवडणुकीत एका मागोमाग एक पराभूत होत असल्यामुळे भाजपची एकहाती विजयाकडे वाटचाल नक्की झाली आहे. महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येणार हा प्रश्न अनेक दिवसांपासून सतावत होता, अनेक जाणकारांनी तज्ञांनी या वेळी कोणालाही एक हाती सत्ता करता येणार नाही. असे भवितव्य व्यक्त केले होते. मात्र भाजपची वाटचाल जोरदार सुरू झाल्याने आणि सर्वच उमेदवारांनी जास्तीत जास्त विजयाकडे वाटचाल केल्याने निवडणुकीचा निकाल सध्यातरी भाजपच्या बाजूने लागत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दरवेळी नागरिक पक्षाकडे बघून नव्हे तर स्थानिक उमेदवाराच्या कामाकडे बघून मतदान करतात .मात्र यावेळी एकगाठा मतदान भाजपला झाल्याचे मतमोजणीत दिसून येऊ लागले आहे, यामुळे निवडणुकीच्या भाष्यकार आणि जाणकार यात आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपने मतदारांपर्यंत पोचून आपली बाजू भक्कम केल्याचे या मतमोजणीत दिसून आले आहे.

Ward No. Winner Party
1 Usha Chavan BJP
2 Muzamil Doni Congress
3 Jyoti Kadolkar Congress
4 Jayterth Saundatti BJP
5
6 Santosh Pednekar BJP
7
8 sohail  sangolli
10
11 Samiulla Madiwale Congress
12 Madinsahab Matwale Independent
13
14 Shivaji Mandolkar Independent
15 Netravati BJP
16 Shivaji Bhatkande BJP
17
18 Sahidkhan Pathan AIMIM
19 Riyaz Killedar Independent
20
21 Priti Kamkar BJP
22 Raviraj Sambrekar BJP
23 Jayant Jadhav BJP
24
25 Zarina Fatekhan Independent
26 Rekha Hugar BJP
27 Ravi Salunkhe Independent
28 Ravi Dhotre BJP
29 Nitin Jadhav BJP
30 Nandu Mirajkar BJP
31 Mina Vijapure BJP
32
33
34
35 Laxmi Rathod BJP
36 Rajshekar Doni BJP
37
38 Mohd Patwegar Independent
39
40 Reshma Kamkar BJP
41 Mangesh Pawar BJP
42 Abhjijeet Jawalkar BJP
43
44
45 Rupa chikaldani BJP
46
47 Asmita Patil Independent
48
49 Deepali Topagi BJP
50
51
52 Khurshia Mulla Congress
53
54 Madhavi Raghochi BJP
55
56
57 Shobha Somnache BJP
58

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.