Monday, December 23, 2024

/

एमआयएम पक्षातर्फे निदर्शने करून निवेदन सादर

 belgaum

नवी दिल्ली येथील राबिया सफिया सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक एमआयएम पक्षातर्फे करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

निवेदन सादर करण्यापूर्वी स्थानिक एमआयएम पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी राबिया के हत्यारोंको फासी दो.. फासी दो.. अशा घोषणा देऊन एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी साऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.

देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहेत याबाबतीत केंद्र सरकार अपयशी ठरले आहे नवी दिल्ली सारख्या देशाच्या राजधानीच्या ठिकाणी घडलेली राबिया सफिया सामूहिक बलात्कार व खुनाची घटना अत्यंत निंदनीय आहे याला स्थानिक पोलिस जबाबदार असून पोलीस रक्षक बनण्याऐवजी भक्षक बनत चालले आहेत. तेंव्हा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा आणि जलद कृती न्यायालयात यासंदर्भातील खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी, अशी मागणी यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष लतीफखान पठाण यांनी केली.

अन्य देशांमध्ये महिलांची अब्रू लुटणार्‍यांचे शीर धडावेगळे केले जाते किंवा त्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली जाते. जेणेकरून बलात्कार व खुनासारखे कृत्ये करणार्‍यांवर चाप बसू शकतो.

तेंव्हा तसाच कायदा भारत सरकारने देखील अंमलात आणावा, अशी मागणीदेखील संबंधित नेत्याने जाहीररीत्या केली. याप्रसंगी एमआयएमचे स्त्री-पुरुष कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.