सप्टेंबर महिन्यात बँकांचे व्यवहार एक दोन नव्हे तर तब्बल 12 दिवस बंद राहणार आहेत. सरकारी सुट्ट्या आल्याने बँकांना सुट्टी मिळत असून आर्थिक व्यवहारांचे नियोजन करावे लागणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार बँका याप्रमाणे सुट्टीवर असणार आहेत.
5 सप्टेंबर: शिक्षक दिन, रविवार
8 सप्टेंबर: शंकरदेव तिथी
9 सप्टेंबर: तिज (हरितालिका )
10 सप्टेंबर: गणेश चतुर्थी
11 सप्टेंबर: दुसरा शनिवार
12 सप्टेंबर : रविवार
17 सप्टेंबर: कर्म पूजा
19 सप्टेंबर: रविवार
20 सप्टेंबर: इंद्र जत्रा
21 सप्टेंबर: नारायण गुरू समाधी दिन
25 सप्टेंबर: चवथा शनिवार
26 सप्टेंबर: रविवार
यापैकी काही सुट्ट्या काही बँका घेणार नसल्याची माहिती हाती आली आहे. आर्थिक नियोजन करताना ग्राहकांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून योग्य निर्णय घ्यावे लागणार आहेत.