माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांना नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कॅबिनेट दर्जा देण्याचा आदेश शनिवारी बजावला होता मात्र रविवारी येडीयुरप्पा यांनी राज्यात कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा घेण्यास नकार दिला आहे.
येडीयुरप्पा यांनी बोम्मई यांना पत्र लिहून कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा घेण्यास नकार दिला आहे.
ज्या सुविधा नुकताच शपथ घेतलेल्या मंत्र्यांना मिळतात त्याच सुविधा येडीयुरप्पा यांनी घ्याव्यात अशी बोम्मई यांची इच्छा होती त्याला येडीयुरप्पा यांनी नकार दिला आहे.
कॅबिनेट दर्जा नाकारल्याने नेमकं येडीयुरप्पा यांच्या मनात चाललय तरी काय याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.