मानसिक संतुलन बिघडलेल्या एका निराधार महिलेस जिल्हा रुग्णालयात दाखल करत तिला आधार देण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं आहे.
हनमन्नावर गल्लीअनगोळ येथील परिसरात गेल्या दोन-तीन वर्षापासून 30- 35 वर्षीय निराधार अनोळखी महिला फिरत होती दररोज या भागातील लोक अन्न पाणी देऊन तिची भूक भागवत होते. पण गेल्या काही दिवसांपासून ह तिचे मानसिक संतुलन खूपच बिघडल्याने ती तेथील नागरिकांना शिवीगाळ करत होती व नग्नावस्थेत फिरत होती त्यामुळे सदर महिला लहान मुलांना दुखापत करेल याची भीती होती त्यामुळे याची कल्पना पोलिसांना देण्यात आली.
शहापूर पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस सुजाता बैलापुरकर या घटनास्थळी पोहोचल्या. त्या महिलेची विचारपूस केली. तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने तिला उपचाराची गरज होती त्याकरिता सुजाता वैलापूरकर यांनी समाजसेविका माधुरी जाधव पाटील व गौतम कांबळे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली व मदतीचा हात मागितला तेव्हा माधुरी जाधव आणि त्यांचे सहकारी गौतम कांबळे हे घटनास्थळी पोहोचून सदर महिलेला मदत केली.
स्थानिक लोकनिय निराधार महिलेच्या वागण्याने खूप त्रास होत आहे आणि भीतीही वाटत आहे अशी तक्रार पोलिसांकडे सामाजिक कार्यकर्त्याकडे करत मदत मागितली त्यानंतर गौतम कांबळे यांच्या ऑटो मधून त्या महिलेला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्यानी सदर महिलेला आधार देत अनगोळ भागांतील जनतेच्या समस्या देखील दूर केल्या आहेत.