मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगाव सह केरळ महाराष्ट्र सीमेवरील आठ जिल्ह्यात वीकेंड कर्फ्यु जारी केला आहे.6 आगष्ट पासून लागू होणाऱ्या या वीकेंड कर्फ्यु मध्ये कोणकोणते व्यवहार सुरू असतील काय काय बंद असेल
रात्री 9 ते सकाळी 5 पर्यन्त नाईट कर्फ्यु असेल त्याची नियमावली
सर्व प्रकारचे राजकीय सामाजिक खेळ मनोरंजन कार्यक्रम मोठ्या संख्येने लोक जमवून करण्यास मनाई
विवाह सोहळे आणि कौटुंबिक कार्यक्रम केवळ 100 लोकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून करणे बंधनकारक
अंतिम संस्कार करण्यात केवळ वीस जणांची उपस्थिती
शासकीय आदेशानुसार सरकारी आणि सामाजिक संस्थांचे कामकाज चालेलं
कोरोनाचे नियम पाळून सर्व धार्मिक स्थळे सुरू असतील मात्र या ठिकाणी यात्रा गर्दी कोणतेही कार्यक्रम करण्यास बंदी
स्थानिक जिल्हाधिकारी मनपा आयुक्त पोलीस आयुक्त कोरोनाची स्थिती पाहून निर्बंध वाढवू शकतात
तर दर आठवड्याला शनिवार रविवार वीकेंड कर्फ्यु असेल त्याची नियमावली
1. राज्य आणि केंद्र सरकार स्थानिक स्वराज्य संस्था, कोविड काळात तात्काळ सेवा देणाऱ्या सर्व खाजगी संस्था सुरू असतील
2.उद्योग, व्यवसाय संस्था तात्काळ आणि 24 तास गरजू सेवा उपलब्ध करून देणाऱ्या सुरू असतील,ओळखपत्र दाखवून या संस्थांतील कर्मचारी ये जा करू शकतात,
3.टेलीफोन आणि इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून फिरण्यास परवानगी,आय टी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी गरजू नसलेल्यांनी घरातून काम करावे,
4.रुग्ण आणि गरजू नातेवाईक गरजेनुसार घराबाहेर पडावे,लसीकरण करण्यासाठी घरा बाहेर पडू शकता
5.किराणा खाद्य फळ भाजीपाला मासे मटण दूध डेअरी आणि जनावरे खाद्य दुकाने सकाळी 5 ते 2 या वेळेत सुरू असतील
6.फिरते भाजी विक्रेते,फिरते विक्रेते सकाळी 5 ते दुपारी 2 पर्यन्त,दारू दुकाने फक्त पार्सल सकाळी 5 ते दुपारी 2, होम डिलिव्हरी सुविधा 24 तास परवानगी,
7.हॉटेल आणि रेस्टारंट पार्सल आणि होम डिलिव्हरी परवानगी
8. रेल्वे सेवा विमान सेवा सुरू असेल
9.विवाह सोहळ्यास 100 लोक तर अंतिम संस्कार 20 लोकांची परवानगी