कोरोनाची संभावित तिसरी लाट रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगाव सह सीमावर्ती जिल्ह्यात दर शनिवारी रविवारी वीकेंड कर्फ्यु जारी करण्यात आलाय. या वीकेंड कर्फ्युच्या पहिल्या शनिवारी सकाळी बेळगाव शहरातील बहुतांश मुख्य रस्त्यावर शनिवारी रात्रीच बॅरिकेड्स लावण्यात आले होते त्यामुळे कुंदा नगरी सुनीसुनी दिसत होती.
महाराष्ट्र आणि केरळ राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या ध्यानात ठेऊन बेळगावात आठवड्याचा लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे बेळगाव पोलिसांनी देखील वीकेंड कर्फ्युचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला आहे.
सकाळी 5 ते दुपारी दोन पर्यंत अत्यावश्यक गरजू वस्तूंची दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे शनीवारी सकाळी भाजी विक्री आणि सुट्टीचा दिवस असल्याने अमावस्ये निमित्त मांसाहारी चिकन मटण विक्रीची दुकाने सुरू आहेत त्या दुकानातून गर्दीही होती
शनिवारी सकाळी पासूनच कित्तुर राणी चन्नम्मा सह अनेक मोक्याच्या ठिकाणी पोलीस वाहनांची तपासणी करत होते डी सी पी विक्रम आमटे यांनीही शहरात अनेक ठिकाणी फेरफटका मारत विकेंड कर्फ्युची कडक अंमलबजावणी करत होते पोलिसांनाही सूचना करत होते.