कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने काढलेल्या आदेशानुसार आज शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून सोमवार दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यू जारी असणार आहे. मात्र रविवारी कर्फ्यू असला तरी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून ध्वजारोहणासाठी थोडी सवलत मिळण्याची शक्यता आहे.
विकेंड कर्फ्यू मार्गदर्शक सूची पुढील प्रमाणे असणार आहे. जीवनावश्यक सेवा, आपत्कालीन सेवा वगळता शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत कडक संचारबंदी असेल. 1) अत्यावश्यक सेवा, आपत्कालीन सेवा, वैद्यकीय सेवा, कोरोना प्रतिबंधक आणि व्यवस्थापन सेवेशी निगडीत सर्व राज्य व केंद्र सरकारी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.
या सेवांशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुक्तसंचार यांची परवानगी असेल. 2) आपत्कालीन आणि जीवनावश्यक सेवेसाठी 24 तास कार्यरत राहणाऱ्या उद्योग, कंपन्या आणि संघटना सुरू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे अधिकृत ओळखपत्र असले पाहिजे.
त्याचप्रमाणे संघटना संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शक्यतो घरातून काम करण्यास प्रोत्साहन द्यावे. 3) टेलिकॉम आणि इंटरनेट कर्मचाऱ्यांना ओळखपत्रासह संचारास परवानगी असेल. आयटी अथवा आरटीईएस कंपन्या किंवा संघटनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शक्यतो घरातून काम करण्यास प्रोत्साहन द्यावे. 4) रुग्ण व त्यांच्या सहाय्यकांसह तातडीचे काम आणि लसीकरणास जाणाऱ्यांना तसा किमान पुरावा दाखवावा लागेल. 5) खाद्यपदार्थ, किराणामाल, फळे, भाजीपाला, मटण आणि मासे विक्री दुकानांसह दूध केंद्रे व पशुखाद्य दुकाने सकाळी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. रस्त्यावरील विक्रेते आणि वितरण व्यवस्थेची दुकाने, स्वतंत्र दारू दुकाने (टेक अवे पद्धतीने) सकाळी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी असेल. घरपोच सेवा 24 तास खुल्या राहतील. 6) उपहारगृहे व खानावळी टेक अवे पद्धतीने सुरू ठेवता येतील. 7) रेल्वे आणि विमान सेवा सुरू राहिल. प्रवाशांना ने-आण करणाऱ्या खासगी वाहनांना परवानगी असेल.
मात्र त्यांना प्रवासाचे तिकीट वगैरे अधिकृत कागदपत्रे दाखवावी लागतील. 8) कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळून 100 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा अथवा कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी असेल. दफनविधी अथवा अंत्यविधीला 20 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नसेल.