कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील 8 जिल्ह्यात वीकेंड कर्फ्यु आणि संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यु जारी केल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री पदाची शपथविधी होताच तिसरी लाट रोखण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं होतं विशेष म्हणजे बंगळुरू सिटीत नाईट कर्फ्युची सुरुवात केली होती.
बेळगाव विजापूर बिदर बंगळुरू मैसूरू चामराजनगर सह आठ जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी वीकेंड कर्फ्यु जारी करण्यात आला आहे. तर राज्यभरात पुन्हा रात्री 9 ते सकाळी 5 पर्यन्त नाईट कर्फ्यु लागू केला आहे. वीकेंड कर्फ्यु दरम्यान केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असणार आहेत.
बेळगाव जिल्ह्यात सध्या 496 कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत अश्यात बेळगाव जिल्हा महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर असल्याने वीकेंड कर्फ्यु जारी केलेल्या सूचित बेळगावचे नाव सामील करण्यात आले आहे.महाराष्ट्र आणि गोव्यातून बेळगावात येणाऱ्या लोकांना आर टी पी सी आर ची तपासणी गरजेचे आहे.
बेळगावात शुक्रवारी रात्री पासून सोमवारी सकाळी पर्यंत हा वीकेंड कर्फ्यु असणार आहे याची अंमलबजावणी शुक्रवारी 6 आगष्ट रात्री 9 पासून होणार आहे