बेळगाव मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी मंगळवारी पर्यंत एकही अर्ज दाखल झाला नव्हता मात्र बुधवारी दोन अपक्ष उमेदवारानी अर्ज दाखल केला आहे.
23 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे .उद्या गुरुवारी कर्नाटक उच्च न्यायालयात आरक्षण विरोधी याचिका प्रलंबित आहे त्यावर सुनावणी होणार असून गुरुवारी नंतर अर्ज भरण्यासाठी गर्दी वाढणार आहे.
अपक्ष उमेदवाराना कागदपत्रे जमवा जमवी करण्यासाठी वेळ लागत आहे त्यामुळे इच्छुकांकडून अर्ज भरण्यास देखील विलंब होत आहे