व्हॅक्सिन डेपोतील स्मार्ट विकास कामासंदर्भात आज सुनावणीच्या वेळी माननीय उच्च न्यायालय बेंगळुर खंडपीठाने आधी दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे. ज्यामध्ये उच्च न्यायालयाने डेपोमधील सर्व विकास कामांवर पुन्हा स्थगितीचा आदेश दिला.
पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. 6 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.राजीव टोपन्नावर आणि सेव्ह व्हॅक्सिन डेपो संस्थेच्या इतर सदस्यांच्या वतीने वकील किरण कुलकर्णी आणि सतीश बिरादार यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेतउच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आणि सर्व पक्षांना नोटिसा बजावल्या. याचिकाकर्त्यांनी स्मार्ट सिटी लिमिटेडद्वारे चालवल्या जाणाऱ्या डेपोमधील बांधकामांना विरोध केला होता.
मागच्या आठवड्यात याचिकाकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली होणारी बांधकामे आणि वृक्षतोड थांबवण्यासाठी निवेदन सादर केले होते. तथापि, विकास कार्ये सुरूच राहिली आणि म्हणून याचिकाकर्त्यांनी कर्नाटकच्या माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
त्यांनी कर्नाटक सरकारच्या दिनांक 6/7/2009 च्या आदेशानुसार डेपो बोटॅनिकल गार्डन म्हणून कायम ठेवण्याची केली असून बांधकामे, उत्खनन, तोडणे आणि झाडे तोडणे थांबवण्यासाठी विनंती केली.यावर न्यायालयाने पर्यावरणींना दिलासा दिला असल्याने समाधान आहे.