कोरोनाच्या छायेत जग पुढे सरकते आहे. त्यातच येणारी तिसरी लाट, या लाटेत लहान मुलांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी “ईन्फ्लुएंझा” ही नविन लस उपलब्ध झाली असून बेळगावच्या जिव्हाळा फौंडेशनने वय वर्ष सहा महिने ते अठरा वर्षा मधील मुलामुलींवर कोरोनाचा होणारा परिणाम टाळण्यासाठी “ईन्फ्लुएंझा” लसीकरण मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेंतर्गत मंगळवारी न्यू गुडशेड रोड येथील डॉ. डी एल पाटील यांच्या समाधान हॉस्पिटल येथे लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात ६ महिने ते-१८ वर्षे वयोगटातील ५० मुलामुलींना लस देण्यात आली. ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही लस देण्यात येत आहे.
लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने बेळगाव परिसरातील विविध भागात ही मोहीम राबविण्यात येणार असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा सुरेखा पोटे सांगितले आहे.
संस्थापिका डॉ. सविता कद्दू,उपाध्यक्ष डॉ. राजश्री अनगोळ डॉ. अनिल पोटे, डॉ. डि. एल्. पाटील, डॉ. मीना पाटील, डॉ. मरियम टेभला, डॉ. केदार सामजी, सेक्रेटरी आरती निपाणीकर, संजीवनी पाटील, संतोष तलपातूर यांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले .