Wednesday, December 25, 2024

/

उपमुख्यमंत्री पद दिले तरी जबाबदारी पार पाडतो-उमेश कत्ती*

 belgaum

बसवराज बोम्मई मंत्रिमंडळात बेळगाव जिल्ह्यातून कुणा कुणाचा समावेश होणार याबाबत चर्चा सुरू असताना अनेक याद्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. माजी मंत्री उमेश कत्ती यांनी मंत्रीपदा बाबत एक वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री पद गेलं आहे मला उपमुख्यमंत्री पद मिळालं तरी ती जबाबदारी पार पाडतो 100 टक्के मला मंत्री पद मिळेल असा विश्वास आहे असे मत उमेश कत्ती यांनी व्यक्त केलं आहे. चिकोडी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं आहे.

घरात वाटणीसाठी थोडा वाद होणे साहजीकच आहे सी एम म्हणून बोम्मई आपला चांगले काम करून दाखवतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मी दिल्लीत जाऊन जे पी नड्डा अमित शाह यांची भेट घेतली व मंत्रिपदाची मागणी केली त्यात काय चूक आहे असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मला संधी दिली तर मंत्री म्हणून चांगलं काम करतो असेही ते म्हणाले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.