Thursday, January 30, 2025

/

गोठ्याला आग : दोन म्हशींचा मृत्यू ; 1.5 लाखाचे नुकसान

 belgaum

शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला लागलेल्या आगीत शेतीचे साहित्य जळून खाक होण्याबरोबरच दोन मशीन चा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री येळ्ळूर बेळगाव येथे घडली. या दुर्घटनेमुळे मुकुंद लक्ष्‍मण मुरकुटे या शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबतची माहिती अशी की, येळ्ळूर येथील शेतकरी मुकुंद मुरकुटे काल शुक्रवारी शेतातील कामे आटोपून रात्री गोठ्यातील जनावरांचा चारा टाकून झोपण्यास गेले. त्यानंतर रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या हंबरण्यामुळे जाग्या झालेल्या मुकुंद यांनी पाहिले तेंव्हा गोठ्याच्या खिडकीतून धुराचे लोट येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी तात्काळ गोठ्यात धाव घेऊन आपल्या जनावरांपैकी एका म्हशीला कसेबसे बाहेर काढले, मात्र अन्य दोन म्हशींचा जीव वाचविण्यात ते अपयशी ठरले. परिणामी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन म्हशी होरपळून जागीच मृत्युमुखी पडल्या तर तिसरी म्हैस गंभीर जखमी झाली आहे. आगीमध्ये गोठ्याचे नुकसान होण्याबरोबरच शेतीची अवजारे, चारा वगैरे जळून खाक झाले आहे.Yellur incident

 belgaum

सदर घटनेची माहिती मिळताच येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील, रमेश मणसे, राजू डोण्याण्णावर यांनी त्वरित मुरकुटे यांच्या घराकडे धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर आज शनिवारी सकाळी तलाठी मयुर मासेकर व पशुवैद्य डॉ. मल्लाप्पा रातण्णावर यांनी दुर्घटनेचे पाहणी करून पंचनामा केला.

सदर घटनेबद्दल येळ्ळूर गावात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी मुकुंद मुरकुटे यांना सरकारकडून नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.