राज्याच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना प्राप्त झाली असून त्यांनी त्याची पुष्टी केली आहे. मंत्रिमंडळात 29 जणांना मंत्रिपद दिले जाणार असले तरी कोणालाही उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.
आम्हाला अधिकृतपणे मंत्रिमंडळाची यादी मिळाली असून त्यात 29 मंत्र्यांची नांवे आहेत. या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज बुधवारी दुपारी 2:15 वाजता राजभवनात होईल असेही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे. राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात 7 ओबीसी, 3 एसएस, 1 एसटी, 7 वक्कलीग, 8 लिंगायत, 1 रेड्डी आणि 1 महिला मंत्री (निपाणी -बेळगावच्या शशिकला जोल्ले) असणार आहे.
के. एस. ईश्वरप्पा (शिमोगा), आर. अशोक (पद्मनाभ शहर), बी. सी. पाटील (हिरेकोर), अश्वथ नारायण (मल्लेश्वर), श्रीरामलू (मुळकालाम्मूरू), उमेश कत्ती (हुक्केरी -बेळगाव), एस. टी. सोमशेखर (यशवंतपुर), डी. के. सुधाकर (चिकबळ्ळापूर), बैरथी बसवराज (के. आर. पुरम), मुरुगेश निराणी (गोरे), शिवराम हेब्बार (यल्लापुर), शशिकला जोल्ले (निपाणी -बेळगाव), नारायणगौडा (केआर पीट), सुनीलकुमार (कर्कला), अर्ग ज्ञानेन्द्र (तीर्थगार), गोविंद कारजोळ (मुधोळ), मुनिरत्न (आरआर सिटी),
एमटीबी नागराज (एमएलसी), गोपाल्य (महालक्ष्मी लेआउट), मधुस्वामी (चिक्कनायकनहळ्ळी), कल्लाप्पा आचार (कलबुर्गी), शंकर पाटील (मुनाकोप्पा नवलगुंडा), कोटा श्रीनिवास पुजारी (एमएलसी), प्रभू चव्हाण (औरड), व्ही. सोमन्ना (गोविंद राजनगर), अंगार (सूल्या) आनंद सिंग (होसपेट), सी. सी. पाटील (नारगुंड) आणि बीबीसी नागेश (टीपटूर) ही राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नांवे आहेत.