पुढील काही महिने क्रिकेट चाहत्यांसाठी फारच बिझी ठरणार आहेत. एका पाठोपाठ एक अशा क्रिकेट मालिका आणि स्पर्धा होणार असून फक्त भारतीय नव्हे तर जगातील सर्वच क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे. त्यातही भारतीय क्रिकेट संघासाठी आणि प्रेमींसाठी पुढील ९० दिवस खऱ्या अर्थाने बिझी असतील.
भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन लढती झाल्या असून भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरी लढत २५ ऑगस्टपासून तर चौथी लढत २ सप्टेंबर आणि पाचवी आणि अंतिम कसोटी १० सप्टेंबरपासून होणार आहे.
इंग्लंड दौरा संपताच भारतीय संघ आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये देखल होईल. इंग्लंड दौरा आणि आयपीएलमध्ये फक्त पाच दिवसांचे अंतर आहे.
आयपीएलचे दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलची अंतिम लढत १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
आयपीएल संपताच दोन दिवसांनी टी-२० वर्ल्डकपची सुरूवात होईल. १७ ऑक्टोबर रोजी पहिली लढत होणार आहे.
भारतीय संघाची लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल. आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकपचे आयोजन युएमध्ये होणार असल्याने खेळाडूंना धावपळ करावी लागणार नाही.