बेळगाव पोलिसांनी बेळगावमध्ये बेकायदेशीर परदेशी रोजगार केंद्रे चालवल्याच्या आरोपाखाली तीन जणांना अटक केली आहे.परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ते बेरोजगार तरुणांना लुटत होते. बेळगावात असे एकही अधिकृत परदेशी रोजगार केंद्र नाही याची जाण आता बेरोजगारानी ठेवावी लागणार आहे.
दरबार गल्लीतील ट्रॅव्हल वर्ल्ड कार्यालय आणि शेट्टी गल्लीतील स्टँडर्ड ग्रुपच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची ओळख इम्तियाज यरगट्टी, फारूक अब्दुल हमीद अशी आहे आणि त्यांच्यावर मार्केट पोलीस स्थानकात इमिग्रेशन कायदा 1983 अन्वये गुन्हा दाखल केला आहे तसेच 420 IPC u/s 10 (24) इमिग्रेशन कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून 315 भारतीय पासपोर्ट आणि 1.13 लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे
अन्य एका संबंधित प्रकरणात इम्रान अहमद सोशल मीडियाद्वारे नोकरीच्या इच्छुकांना परदेशी नोकरीसाठी आमिष दाखवत होता आणि त्याच्यावर एपीएमसी पोलिसांनी 420 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
परराष्ट्र मंत्रालय (एमईए) अंतर्गत स्थलांतरितांचे संरक्षक (पीओई) यांनी कोचीमध्ये कार्यरत असलेल्या बेकायदेशीर परदेशी भरती एजन्सींविरूद्ध लोकांना सावध केले आहे .जे कोविड साथीच्या काळात परदेशात नोकरीच्या आमिषाने आले आहेत.ते महामारी-प्रेरित आर्थिक संकटामुळे नोकरी गमावलेल्या भोळ्या लोकांना लक्ष्य करत होते.
आता आपली फसवणूक होऊ नये याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे.