Saturday, November 23, 2024

/

जिल्ह्यात 29 नवे रुग्ण : 35 जणांना डिस्चार्ज

 belgaum

बेळगाव जिल्ह्यामध्ये आज शनिवार दि. 28 ऑगस्ट रोजी नव्याने एकूण 29 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सक्रीय रुग्णांची संख्या 384 झाली आहे.

जिल्ह्यातील मृतांची संख्या 887 झाली असून गेल्या सात दिवसातील पॉझिटिव्हिटी रेट -0.41 टक्के इतका आहे.

प्रयोगशाळेत आज एकूण 6,731 स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तसेच आज दिवसभरात 36,769 जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 384 झाली असून 35 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात आज नव्याने एकूण 1,229 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत बेळगाव जिल्ह्यात आज आढळून आलेल्या 29 रुग्णांमध्ये अथणी तालुक्यातील 1, बेळगाव 17, चिक्कोडी 3, गोकाक 2, हुक्केरी 5 आणि रायबाग तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.