बेळगावात सुरू आहे टी ई टी- टीईटी परीक्षा अर्थात शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा आज रविवारी बेळगाव शहरातील विविध शालेय संस्थांमध्ये घेण्यात येत आहे.
शिक्षक बनून ज्ञानार्जन करण्याची इच्छा बाळगणारे अनेक भावी शिक्षक या परीक्षेला सामोरे जात आहेत.
पहिला पेपर सकाळी 10 ते 12 .30 पर्यंत होता तो झाला असून दुसरा पेपर 2.30 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. बेळगावी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला आहे.
सरदार्स, मराठा मंडळ, जी ए स्कुल आणि इतर संस्थामध्ये परीक्षा सुरू असून कोविड एसओपी मार्गदर्शक तत्त्वांनुसार परीक्षा घेण्यात येत आहे. पोलीस देखील परीक्षा केंद्रांवर तैनात आहेत.