दहावीनंतर कोणत्या साइडला जायचं? कोणतं करिअर निवडायचं? असे प्रश्न प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असतातच. त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते. हीच मानसिकता हेरुन, सुनिल जाधव सेवा केंद्राने करिअर मार्गदर्शन आयोजन केलं होतं.
करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असताना पालक आणि विद्यार्थ्यांकडून साधारणत: काही पर्यायांचाच विचार होतो. त्यामुळे केवळ ठरावीकच अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो आणि कालांतराने उत्तम करिअरचे स्वप्न भंगते. म्हणून दहावी आणि बारावीनंतर करिअरबाबत योग्य मार्गदर्शन घेऊनच पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, असा सल्ला सुनिल जाधव सेवा केंद्राचे करिअर कौन्सिलर जाधव यांनी विद्यार्थी-पालकांना दिला.
सुनिल जाधव करिअर सेवा केंद्राच्या वतीने चवाट गल्ली बेळगाव येथील त्यांच्या कार्यालयात ‘दहावी, बारावीनंतरचे अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांतील संधी’ या निःशुल्क मार्गदर्शन कार्यशाळेत ते अनेक विद्यार्थ्यांशी बोलत आहेत.
दहावी, बारावी आणि पदवीनंतर करिअरचा निर्णय घेताना अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. चुकीच्या अभ्यासक्रमाची निवड केल्यास नंतर मुले चुकीचा मार्ग अवलंबतात. म्हणून करिअरचे नियोजन करताना स्वतःची ओळख करणे आणि विविध करिअर पर्यायांची माहिती मिळविणे आवश्यक आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सुनिल जाधव यांनी यूपीएससी, एमपीएससी, बँक, रेल्वेसह विविध स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि अभ्यासक्रमाच्या विषयघटकांचा आढावा विद्यार्थ्यांच्या समोर घेत होते. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासह स्पर्धा परीक्षांची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळविण्याच्या त्यांनी विद्यार्थ्यांना टिप्स दिल्या. स्पर्धा परीक्षांसाठी कठोर मेहनत, जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्तीसह अभ्यासातील नियमितता महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेला विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने रोज सायंकाळी उपस्थिती होत आहे.
मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना यशाचा नवाच मार्ग सापडला.
10 वी झाली की आयुष्याला कलटणी देणारी करिअरची अवघड वळण वाट सुरू होते. या वाटेवर मार्गदर्शन करण्यासाठी सुनिल जाधव सेवा केंद्र करियरच्या यांच्या वतीने ‘दहावीनंतर काय?’ याविषयावर विनामुल्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चवाट गल्ली बेळगाव येथील सुनिल जाधव सेवा केंद्राच्या कार्यालयात दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत करण्यात येत आहे.