कर्नाटक राज्य माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने दहावीच्या रिपीटर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुनर्परीक्षा 27 व 29 सप्टेंबर या दोन दिवशी होणार आहे.
एका दिवशी तीन विषयांचे पेपर या पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. 27 सप्टेंबर रोजी गणित विज्ञान आणि समाज विज्ञान तर 29 सप्टेंबर रोजी भाषा विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे .
यापूर्वी झालेल्या परीक्षेत निकाल मान्य नसणाऱ्यांना तसेच अनुत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना ही परीक्षा देता येणार आहे. अनेक विद्यार्थी निकालावर नाराज झाले असून पडलेले गुण मान्य नसल्याची तक्रार परीक्षा मंगळाकडे करण्यात आली होती.
त्यामुळे या परीक्षेचा निर्णय घेण्यात आला असून मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाले नाही त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी मिळाली आहे.