Sunday, December 22, 2024

/

SSLC परीक्षेचा निकाल जाहीर यावेळी एक विद्यार्थी वगळता 99.9% विद्यार्थी उत्तीर्ण

 belgaum

SSLC परीक्षेचा निकाल जाहीर यावेळी एक विद्यार्थी वगळता 99.9% विद्यार्थी उत्तीर्ण

बंगळुरू येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना शिक्षण मंत्री बी सी नागेश म्हणाले की 4,70,160 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 2,50,317 विद्यार्थ्यांना A ग्रेड, 2,87,694 विद्यार्थ्यांना B ग्रेड आणि 1,1,610 विद्यार्थ्यांना C ग्रेड मिळाले. 157 विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 आणि दोन विद्यार्थ्यांनी 625 पैकी 622 गुण मिळवले.
एसएसएलसीचा निकाल वेळेत

कर्नाटकातील दहावी अर्थात एस एस एल सी परीक्षेचा निकाल सोमवारी लागला . कर्नाटक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने तशी घोषणा केली होती. माजी शिक्षणमंत्री एस सुरेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा झाली होती तर आता नूतन शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी निकाल जाहीर केला.
हा निकाल सर्वप्रथम इंटरनेटच्या माध्यमातून दिला जाणार असून त्यानंतर तो शाळेतही मिळणार आहे.
दहावीच्या मुलांना सक्षमपणे पुढील शिक्षण घेण्याची संधी मिळावी असा आग्रह माजी शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी धरला त्यामुळेच बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले होते.
निकाल लागताच पुढील अभ्यासक्रम प्रवेशाला सुरुवात होणार असून कॉलेज मध्ये गर्दी वाढणार आहे.

निकाल पहाण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

*https://www.karresults.nic.in*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.