मच्छे या गावात असलेली आपली जमीन क्रीडा उपक्रम राबवण्यासाठी दान देण्याचा उपक्रम एका व्यक्तीने केला आहे. तीन एकर जमीन आम आदमी पार्टीच्या नेत्या रोमी भाटी यांच्याकडे सोपवण्यात आली असून हे दान आपण क्रीडा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आप च्या राष्ट्रीय नेत्या असलेल्या रोमी भाटी यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. कित्तूर राणी चन्नम्मा यांचे वारसदार असलेले महेंद्र मलसर्जा देसाई यांनी आम आदमी पार्टीच्या दिल्ली येथील सरकारच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन ही जमीन आपण दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चांगले प्रशासन राबवून नागरिकांची सोय केली असून आता या जमिनीचा उपयोग बेळगाव परिसरात क्रीडा उपक्रमासाठी करावा असे आवाहन त्यांनी केले.
रोमी भाटी यांनी सांगितल्याप्रमाणे आता या जागेत क्रीडा विद्यापीठ उभारले जाणार आहे. बेळगाव आणि परिसरातील नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या क्रीडा शिक्षणावर या माध्यमातून भर दिला जाणार आहे.
Trending Now