Sunday, November 24, 2024

/

शिवसेना देखील उतरणार मनपा निवडणूक रिंगणात

 belgaum

बेळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणूक भगव्याच्या रक्षणासाठी सर्वांना एकत्र घेऊन लढविण्याचा निर्णय बेळगाव जिल्हा शिवसेनेने घेतला आहे.या निर्णयामुळे प्रमुख राष्ट्रीय पक्षांनाही आता हादरे बसण्याची वेळ आली आहे.

बेळगाव मनपा निवडणुकीसाठीचे वेळापत्रक निश्चित झाले आहे आणि ही निवडणूक मोठ्या प्रमाणात पक्षाच्या चिन्हावर होणार आहे.अशी शक्यता सध्या राजकीय जाणकारांतून व्यक्त होत आहे,या स्थितीत मनपा वरील मराठीचे अस्तित्व राखणे हे या निवडणुकीत आव्हान असणार आहे.यात आता शिवसेनाही निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी बेळगाव महानगर निवडणुक पक्षाच्या चिन्हाच्या आधारे घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे, जी त्या त्या पक्षांच्या राज्यप्रमुखांशी सल्लामसलत केल्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.यासंदर्भातील अंतर्गत घडामोडी जोरात सुरू आहेत.

भाजप ने यावर्षी आपले जास्तीतजास्त उमेदवार देण्याचा आणि त्यांना निवडणुकीसाठी पक्षाचे बी फॉर्म देण्याचा विचार सुरू केला आहे. बेळगाव मनपा निवडणूक पक्षाच्या तिकिटावर लढवण्याबाबत अनेक वर्षांपासून पक्षाच्या मंचावर प्रस्ताव आहेत. पक्षाचे अध्यक्ष नलीन कुमार कटील यांच्यासोबत चर्चा करून पक्षाचे स्थानिक नेते अंतिम निर्णय करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

हुबळी येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात प्रदेश काँग्रेस प्रभारी सुरजेवाला यांनी पक्षाच्या उमेदवारांनी पक्षाच्या चिन्हावर मतदान प्रक्रियेत भाग घेण्याच्या सूचना आधीच दिल्या होत्या.
जर या दोन्ही राजकीय पक्षांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका घेण्याचे ठरवले, तर प्रादेशिक पक्ष, जेडीएसलाही चिन्हाच्या अपरिहार्यतेला सामोरे जावे लागेल.

एमआयएम आणि आम आदमी पार्टी सारखे पक्षही या वेळच्या निवडणुकीत एंट्री करतील यात शंका नाही. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकजूट राखल्यास ठीक अन्यथा मनपावरील भगव्याचे अस्तित्व किती सुरक्षित राहणार हे पुढील काळ ठरवणार आहे.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार बेळगाव जिल्हा शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक आज शुक्रवारी दुपारी शहरातील कोंडुसकर भवन येथे पार पडली. बैठकीत विविध विषयांसह प्रामुख्याने मनपा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. तसेच सदर निवडणूक भगव्याच्या रक्षणासाठी सर्वांना एकत्रित घेऊन सर्व जागांवर लढविण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपप्रमुख बंडू केरवाडकर यांनी आपले विचार मांडले. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख दत्ता जाधव यांनी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.
बैठकीस शिवसेना शहर प्रमुख दिलीप बैलुरकर, तालुकाप्रमुख सचिन गोरले, चंद्रकांत कोंडुसकर, उपतालुकाप्रमुख पिराजी शिंदे, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, प्रकाश राऊत, तानाजी पावशे, बाळासाहेब डंगरले, राजू कणेरी, नारायण पाटील, प्रदीप सुतार, विनायक जाधव आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.