Tuesday, January 7, 2025

/

शिवाजीनगर भागात या युवा चेहऱ्याला पसंती

 belgaum

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्र. 14 मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवाजी पुंडलीक मंडोळकर हे रिंगणात असून त्यांना प्रभागात सर्वत्र वाढता पाठिंबा मिळत आहे. हा पाठिंबा लक्षात घेता आत्तापासूनच शिवाजी मंडोळकर यांचे पारडे जड झाले आहे.

धडाडीचे युवा कार्यकर्ते असणारे शिवाजी मंडोळकर हे होलसेल भाजी मार्केटमध्ये कमिशन एजंट असून त्यांचे दुकान आहे. त्यांचे वडील पुंडलिक मारुती मंडोळकर हे समितीचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते आणि शिवाजीनगर येथील प्रमुख पंच आहेत. मराठीच्या मुद्द्यावर नेहमी आक्रमक असणाऱ्या पुंडलिक मंडोळकर यांना शिवाजीनगरचे बाळासाहेब ठाकरे असे म्हंटले जाते. त्यांच्या पुण्याईमुळेच शिवाजी मंडोळकर यांना महाराष्ट्र एकीकरण समितीची उमेदवारी मिळाली असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

उमेदवार शिवाजी मंडोळकर यांचा सामाजिक क्षेत्रात वावर असल्यामुळे लोकांच्या अडचणींची त्यांना जाण आहे. भ्रष्टाचार मुक्त समाज निर्मिती ही काळाची गरज आहे असे मानणाऱ्या शिवाजी यांना सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधावयाचा आहे. यासाठीच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 14 मध्ये शिवाजीनगर येथील पंजीबाबा परिसरासह जुन्या गांधीनगर येथील पाच गल्ल्या येतात. या ठिकाणी सध्या शिवाजी मंडोळकर यांनी प्रचाराची जोरदार आघाडी उघडली आहे. शिवाजीनगर येथील गल्ली क्र. 4, 5, 6 व 7 या ठिकाणच्या मतदारांनी शिवाजी मंडोळकर यांना जाहीर पाठिंबा देऊन बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ओल्ड गांधी नगर मधील शिवसेना नेते चंद्रकांत कोंडुस्कर आणि श्रीराम सेनेचे सचिन चव्हाण यांनी शिवा मंडोळकर यांच्यासाठी कंबर कसली आहे.Bavdekar

शिवाजी नगर ओल्ड गांधी नगरच्या बहुतांश युवक मंडळांच्या फलकांवर तसा उल्लेखही करण्यात आला आहे. याखेरीज जय दुर्गा महिला मंडळ, स्थानिक पंच कमिटी, शिवशाही युवक मंडळ तसेच अन्य युवक मंडळ व महिला मंडळाचा मंडोळकर यांना पाठिंबा आहे. माजी नगरसेवक नारायणसिंग राजपूत यांनी आपला संपूर्ण पाठिंबा शिवाजी मंडोळकर यांना व्यक्त केला आहे. शिवाजीनगर प्रमाणेच जुन्या गांधीनगर येथील दुर्गा माता रोड आदी भागातील मतदारांनी मंडोळकर यांना आपला पाठिंबा दिला आहे.

शिवाजी मंडोळकर यांचे सध्या झंझावाती प्रचार दौरे सुरु आहेत. या प्रचार दौऱ्यांमध्ये माजी नगरसेवक नारायणसिंग रजपूत, मल्लेश बडबंजी, सचिन चव्हाण, रवी निर्मळकर, विजय पवार, दीपक किल्लेकर, अनिल पवार, महादेव पवार, संभाजी मेलगे, अनंत गरडे, राजू कुरणे, विजय घसारी, मनोज ताशिलदार, मदन सुभेदार, अर्जुन यादव आदी शिवाजीनगर व गांधीनगर येथील कार्यकर्ते व समर्थकांचा सहभाग असून त्यांनी मंडोळकर यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. समिती उमेदवार शिवाजी मंडोळकर यांना मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता त्यांचे तगडे आव्हान विरोधकांसमोर असणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.