Wednesday, November 20, 2024

/

शशिकला जोल्ले यांच्यासाठी बंगळूरात झिरो ट्राफिक.

 belgaum

अंडी खरेदी प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या निपाणीच्या आम.शशीकला ज्वोले यांना बसवराज बोम्मई मंत्रिमंडळात स्थान मिळणार का याबाबत उलटसुलट चर्चेला जोर आला होता.ज्वोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही अशी दाट शक्यता व्यक्त केली जात होती.

दरम्यान अंतिम क्षणी मंत्रिमंडळाच्या यादीत शशिकला ज्वोले यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. त्यावरून विरोधकांनी बसवराज सरकार विरोधात टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली आहे.

यातच शशिकला जोल्ले यांना आजच्या शपथविधी सोहळा सोहळ्यासाठी विमानतळावरून राजभवना पर्यंत झिरो ट्राफिक व्यवस्था करून देण्यात आली.

त्यामुळे तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे बेंगळूरु शहरात काही ठिकाणी ट्राफिक ची कोंडी निर्माण झाली. मंत्रीपद स्विकारण्यापूर्वीच आमदार ज्वोले यांना देण्यात आलेल्या झिरो ट्राफिक व्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही सवाल उठविण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.