झिरो ट्रॅफिक आणि अंडीवाटप घोटाळ्याचा आरोप असलेल्या
धर्मादाय, वक्फ आणि हज खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी आपल्यावरील आरोप म्हणजे बदनामी करण्याचे षडयंत्र आहे असे म्हटले आहे. याबाबत कोणतेही स्पष्टीकरण वा प्रतिक्रियादेण्यास साफ नकार दिला आहे.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात महिला व बालकल्याण खात्याचा कार्यभार सांभाळताना शशिकला जोल्ले यांनी अंगणवाडीमार्फत बालकांना अंडीवाटप करावयाच्या योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.
अंडीवाटपाचे टेंडर मंजूर करण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तरीही बसवराज बोम्मई मंत्रिमंडळात धर्मादाय, वक्फ आणि हज खात्याचे मंत्रीपद मिळवण्यात शशिकला जोल्ले यशस्वी ठरल्या आहेत.
यावरून पुन्हा एकदा त्यांच्यावरील आरोपांची पुन्हा चर्चा झाली आहे. यावर त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्यावरील आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. माझा त्याच्याशी काही संबंध नाही, भ्रष्टाचाराशी संबंधित व्हिडिओमध्ये मी एक शब्दही बोललेले नाही.
त्यामुळे यावर उत्तर देणार नाही. झिरो ट्रॅफिकमधून मी आले नाही. कारमधून उतरल्यावर मी थेट शपथ घेण्यास गेले. हे केवळ मला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे असे जोल्ले यांनी सांगितले.
एकंदर आपल्यावरील आरोपांबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार देत आपल्याला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे असे जोल्ले यांनी सांगितले.