*क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर यांच्यावतीने पवित्र श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते दरवर्षी या ठिकाणी श्रावणात वेगवेगळे देखावे सादर केले जातात.
गेल्या तीन वर्षांपासून विविध प्रकारचे देखावे सादर करून शिवभक्तांना विशेष पर्वणी देणारा म्हणून ह्या मंदिराची गणना होत आहे अशातच वर्षी पहिल्या श्रावण सोमवारी संपूर्ण ब्रम्हांड दर्शनाची विशेष सोय आणि श्री कपिलेश्वरा ची दर्शनाची व्यवस्था केलेली आहे.
तत्पूर्वी रविवारी रात्री 12 वाजता संपूर्ण बेळगावकर नागरिकांच्या वतीने विश्वस्त मंडळांकडून अभिषेक घालून आरती झाल्यानंतर सर्व शिवभक्तांसाठी मंदिर अभिषेकासाठी खुले राहील पहाटे पाच वाजता रुद्रभिषेक व श्रावणी सोमवार निमित्त त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सोमवारी सायंकाळी सात वाजता पालखी प्रदक्षिणा व महाआरती संपन्न होणार आहे करोना च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटीचे तंतोतंत पालन करून उद्या भक्तांना विशेष दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे.
उद्या शिवभक्तांना विशेष विनंती कृपया मास्क सामाजिक अंतर सॅनिटायझर कोणीही गडबड गोंधळ न करता श्री कपिलेश्वर यांचे दर्शन घ्यावे असे विश्वस्त मंडळ कडून कळविण्यात येत आहे .
मंदिरात ब्रह्मांडाचा देखावा सादर करण्यासाठी तानाजी गल्लीतील सुप्रसिद्ध आर्टिस्ट वसंत पाटील व विनायक डेकोरेटर चे विनायक पालकर यांच्या मार्गदर्शनानुसार हा देखावा सादर करण्यात आला आहे.