बेळगाव महापालिका निवडणूक पक्ष चिन्हावर लढविण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आम्ही इतरांप्रमाणे नाही. आमच्या पक्षाचीही विचारधारा आहे, असे केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
बेळगावात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले की, अनुसूचित जमातींच्या विकासासाठी 7.5 टक्के इतके आरक्षण देण्यात यावे अशी विनंती मी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे. बोम्मई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी त्यासाठी थोडा वेळ मागून घेतला आहे. ते स्वतः अभ्यास करून कार्यवाही करणार आहेत. यापूर्वीच्या सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे ही मागणी पूर्ण झाली नव्हती. आता भाजप सरकार ही मागणी पूर्ण करेल काय? ते पाहणे बाकी आहे असे जारकीहोळी म्हणाले.
बेळगाव महापालिका निवडणूक पक्ष चिन्हावर लढविण्याचे अद्याप निश्चित झालेले नाही. आम्ही इतरांसारखे नाही आमच्या पक्षाची स्वतःची विचारधारा आहे, सिद्धांत आहे. बेळगाव आणि हुबळीसह सर्वत्र त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. काँग्रेस सरकारने चांगले काम केले आहे आणि आम्हाला लोकांचा भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वासही आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.