उसने दिलेले दोन हजार रुपये परत देण्याची मागणी केल्याच्या कारणावरून मित्राने चाकूने गळ्यावर सपासप वार करून एकाचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी वडगाव बस स्टॉप येथे घडली. या क्षुल्लक कारणामुळे हा खून झाला आहे.
सोमवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान महादेव जाधव (वय 55) रा.भारत नगर मूळचा आंबेवाडी याचा खून झाला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महादेव जाधव व सुरज केदारीचे हे दोघेही एका कारखान्यात काम करत होते. महादेव ने सुरज कडून उसने दोन हजार घेतले होते.
यापूर्वी सूरजने पैशाची मागणी केली असता महादेवने त्याला मारबडव केली होती. माझे दिलेल्या पैशाची मागणी केल्याने मलाच मारबड करतोस म्हणून या रागाने संतापलेल्या सूरजने सोमवारी सकाळी त्याच्यावर पाळत ठेवून चाकूने गळ्यावर सपासपा वार करून त्याचा खून केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस संघाचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली मृत अवस्थेत पडलेल्या महादेव जाधव याचा या घटनेचा पंचनामा केला मृतदेह जिल्हा इस्पितळातील शवगृहात हलवण्यात आला.
खुनी हल्ला करण्यात आलेल्या सुरज पुंडलिक केदारीचे याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी पोलीस करीत आहेत.