कोरोना काळात महाराष्ट्र कर्नाटक हद्दीवरील पंचक्रोशीतील नागरिकांना बेळगाव मध्ये प्रवेश करण्यासाठी कर्नाटक पोलिस प्रशासनाकडुन त्रास होत आहे.
त्यांची RTPCR चाचणी व vaccine रिपोर्ट शिवाय प्रवेश देत नसल्यामुळे नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.याविरोधात चंदगड तालुक्यातील जनता भडकली असून गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
ग्रामपंचायत शिनोळी बु यांच्या वतीने तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकीरी मा.रणवरे साहेब यांच्या कडे निवेदन देण्यात आले.ये जा करण्यामागे रोजी रोटीचा प्रश्न असून याकडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली.शिनोळी बुद्रुक चे सरपंच नितीन नारायण पाटिल व अमृत जत्ती उपस्थित होते
याचबरोबरीने बाची चेकपोस्ट कडे ठोक मोर्चा काढून कर्नाटक सरकार व पोलिसविरोधातील आपला संताप व्यक्त करण्यात आला आहे.
बेळगाव आणि चंदगड चे जुने सबंध आहेत.अनेक लोक नोकरी व व्यवसाय निमित्त ये जा करीत असतात.कोरोनाचे नियम त्रासदायक ठरत असून यात चंदगड च्या नागरिकांना सवलत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.