व्यवसाय व उद्योगक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनो सावधान …! तुमचा कॉम्प्यूटरवरील व्यवसायिकदृष्टया अतिमहत्वाचा डाटा करप्ट करून तुम्हाला तुमचाच डाटा परत करण्यासाठी होऊ शकते लाखोंमध्ये पैशांची मागणी !! … होय हे सत्य आहे कारण हॅकर्सनी शोधले आहे लुटीचे नवे तंत्र !!!
प्रतिक चव्हाण हे नवी मुंबईतील सेंद्रीय खाद्यपदार्थाचा व्यापार करणारे एक उद्योजक. आपल्या ओबास्केट कंपनीच्या माध्यमातून ते ऑनलाईन व्यवसाय करतात. त्यामुळे त्याचा सगळा डाटा कंप्यूटरवर सेव्ह असतो.
काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या कॉम्पूटरवर एक फ्री सॉफ्टवेअर इंस्टॉल केले. मात्र त्यांना हे लक्षात आले नाही की ते फ्री सॉफ्टवेअर म्हणजे अज्ञात हॅकर्सनी रॅमसमवेर (Ramsomware) या घातक व्हायरसद्वारे केलेला तो हल्ला होता.
या रॅमसमवेर व्हायरसमुळे कॉम्पूटरमधील सगळ्या फाइल्स करप्ट होतात. त्या पुन्हा वापरायच्या असतील तर या हॅकर्सनी ई-मेल करून तब्बल १०,००० डॉलर्स म्हणजे जवळपास साडेसात लाख रुपयांची मागणी केली. कंपनीशी संबंधित अतिमहत्वाची माहिती या तिन्ही कॉम्प्युटर्सवर सेव्ह होती. या व्हायरसमुळे त्यातील दोन कॉम्पुटर खलास झाले. मात्र एका कॉम्पूटरवर आयओकेन अँटीव्हायरस इन्स्टॉल केलेला असल्यामुळे त्यावरील हल्ला निष्प्रभ ठरला आणि त्यांचा एका कॉम्प्यूटरवरील डेटा सुरक्षित राहिला.
त्यामुळे कॉम्पूटरवरील अतिमहत्वाचा डाटा हाच व्यवसायाचा प्राण असल्याने व्यवसाय व उद्योगक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी सावधान राहण्याची गरज आहे.
म्हणून इंटरनेटवर उपलब्ध असणारे फ्री सॉफ्टवेअर हे व्हायरस किंवा रॅनसमवेर तर नाहीत ना याची खबरदारी घेतली पाहिजे आणि आपल्या कॉम्पूटरवर आयओकेनसारखे अद्ययावत अँटीव्हायरस असायला हवेत.