Wednesday, January 1, 2025

/

नवीन रेशन कार्ड काढायचंय? जाणून घ्या, कुठे आणि कसा करायचा अर्ज ?

 belgaum

रेशन कार्ड (Ration Card) हे अत्यंत महत्त्वाचं असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. फक्त रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला रेशन दिले जाते.

अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून रेशन कार्डचा वापरही केला जातो. उदाहरणार्थ एलपीजी कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स इ. हे अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणूनही मान्य केले जाते. परंतु मात्र रेशन कार्ड प्रत्येकजण तयार करू शकत नाही. हे फक्त एका विशिष्ट उत्पन्नाच्या गटासाठी आहे, ज्याचे प्रमाण राज्यात वेगवेगळे आहे.

भारताचे नागरिकत्व असणारा देशातील प्रत्येक नागरिक रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो. 18 वर्षाखालील मुलांचं नाव हे पालकांच्या रेशन कार्डमध्ये जोडले जाते. तर दुसरीकडे 18 वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास तुम्ही स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज करू शकता.Reshan card

रेशन कार्डसाठी ‘ही’ कागदपत्र आवश्यक

– आधारकार्ड

– इनकम सर्टिफिकेट

– मतदान कार्ड / मतदार ओळखपत्र

– वीज बिल .

जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?

अर्जदार रेशन कार्डसाठी चवट गल्ली बेळगाव मारुती मंगल कार्यालयासमोर कलामृत निवास येथील सुनील जाधव सेवा केंद्रामध्येही देखील अर्ज करू शकतो. संपर्क क्रमांक 9964370261- रेशन कार्ड फॉर्म सबमिट केल्यानंतर, स्लिप घ्यायला विसरू नका. अधिक माहितीसाठी सुनिल जाधव यांना संपर्क करू शकता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.