बेळगाव मनपा निवडणुकीत एम प्लस एम ची जोरात चर्चा सुरू आहे. आपले काय म्हणणे आहे? असा प्रश्न विचारल्यावर लगेचच मला बाकी काही माहीत नाही.
आय एम ओन्ली फॉर एम आय एम असे उत्तर एम आय एम चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी दिले.
आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आले होते. यावेळी भाजप सारख्या पक्षांनी उठवलेल्या अफवेला त्यांनी एका वाक्यात पूर्णविराम दिला आहे.
एम आय एम आणि एम ई एस एक झालेत अशी अफवा पसरवून निर्माण करण्यात आलेली धार्मिक अस्तिरता दूर करण्यास ओवेसी यांचे एक उत्तर पुरेसे ठरले आहे.
यावेळी आम्ही कमी जागांसाठी लढत आहोत. विजयी होणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही कुणाशीही युती करणार नाही.
विधानसभेला आम्ही जेडीएस सोबत युती करून जागा रिकामी सोडली पण जेडीएस ने काँग्रेस सोबत युती करून चूक केली. यामुळे आम्ही आता युती करणे टाळले आहे. हे सुद्धा ओवेसी यांनी स्पष्ट केले.