सीमावर्ती भागात अर्थात बेळगाव जिल्ह्यातील आता वीकेंड कर्फ्यु असणार नाही . कर्नाटक सरकारने हा निर्णय सोमवारी झालेल्या विशेष बैठकीत घेऊन सीमावासियांना एक मोठा दिलासा दिला आहे .
कर्नाटकात बेळगावसहित सीमावर्ती जिळूयात प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत वीक एंड कर्फ्यू चे आयोजन करण्यात येत होते. शनिवारी आणि रविवारी दुपारी दोन पर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वस्तूंच्या व्यापारावर निर्बंध आणण्यात आले होते.
मात्र आता वीकेंड कर्फ्यू मागे घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे .
त्याचबरोबरीने लग्न समारंभांसाठी मंगल कार्यालयाच्या एकूण क्षमतेच्या 50% लोकांना घेऊन विवाहसमारंभ करता येणार आहे.जास्तीतजास्त एकावेळी 400 नागरिक एकत्र येऊन विवाहसमारंभ करू शकतात.
यामुळे आता धुमधडाक्यात लग्न करता येऊ शकते.
केरळ आणि महाराष्ट्र येथून होणाऱ्या प्रवेशावर निर्बंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत. तेथून प्रवेश करताना आरटीपीसीआर ची सक्ती असणार आहे.