केरळ आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, शिवाय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून आणखी किमान 2 आठवडे राज्यातील शाळा पुनश्च सुरू करू नयेत, अशी सूचना कर्नाटक सरकारचे कोरोना सल्लागार आणि जयदेव हॉस्पिटल बेंगलोरचे संचालक डॉ. मंजुनाथ यांनी केली आहे.
शेजारील राज्यातील कोरोनाचा कहर आणि तिसरी लाट लक्षात घेता शाळा पुनश्च सुरू करणे म्हणजे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे, असे डॉ. मंजुनाथ यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीदेखील शेजारील राज्यातील कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता सध्या शाळा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले.
खाजगी शिक्षण संस्थांनी 2 ऑगस्टपासून शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले होते. मात्र नंतर त्यांनी आपला निर्णय रद्द केला आहे.