राज्य सरकारच्या कोविड मार्गसुची अनुसार कोरोनाच्या पाश्वभुमीवर आगामी मोहरम सणांच्या मिरवणुकीला देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.रविवारी रात्री मार्केट पोलीस स्थानकात शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरिक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी यांनी मुस्लिम समाज बांधवाना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले.
आगामी मोहरम च्या पाश्वभूमीवर सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.शेजारील महाराष्ट्र राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पहाता शनिवारी रविवारी वीकेंड कर्फ्यु आणि दररोज नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे.
राज्य सरकार कडून सणात कोविड नियमांचे कडेकोट पालन आणि गर्दीवर वर बंदी घालण्यात आली आहे सर्व साधे पणाने साजरे करा असे आवाहन करण्यात आले आहे त्यानुसार मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोहरम सण साधे पणाने होणार आहे याची माहिती पोलिसांनी उपस्थिताना दिली.
पुढील आठवड्यात मोहरम सण येत आहे त्या पाश्वभूमीवर पोलिसांनी आतापासूनच बैठका घेत नियमावली सांगण्यास सुरुवात केली आहे.कोणत्याही परिस्थितीत मोहरम मिरवणूक आणि पंजा भेटीस निर्बंध घालण्यात आले असून मस्जिद दर्गा किंवा घरात पंजाची स्थापना करू शकता असे कळवण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरे आणि पी एस आय विठ्ठल हावणुर उपस्थित होते.
भारतीय समाज मन हे नेहमीच सणात गुंतलेले असते पण कोरोनाच्या प्रादुर्भावाने कोणताही सण साजरा करता येत नाही या सांस्कृतिक हानीमुळे लोकांच्यात निराशा पसरली आहे.लोकांच्या मनावरील हे मळभ जाण्यासाठी कोरोनाचा नायनाट होणे खूप गरजेचे आहे आणि सदृढ सांस्कृतिक वारसा परत एकदा लोकांना अनुभवता आला पाहिजे.