Sunday, November 24, 2024

/

बी के कंग्राळी भागात आढळला पांढरा पण कावळाच

 belgaum

बेळगावच्या लगत असलेल्या बी के कंग्राळी भागात शनिवारी पांढरा कावळा आढळला. नेहमी काळ्या गॅरंटी कलर ने आढळणाऱ्या या पक्षाला पांढऱ्या रंगात पाहिलेल्या लोकांनी बेळगाव live शी संपर्क साधला.

कावळा म्हणजे काळा हे समीकरण असतांना हे नवीन काय? या नागरिकांच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न बेळगाव live ने केला असता चांगली माहिती मिळाली आहे.

बेळगाव live ने पक्षीप्रेमी निरंजन संत यांच्याशी संपर्क साधला असता हा कावळ्यातला जन्मता असलेला दोष असून तो कावळाच आहे पण काळा नाही ही गोष्ट निदर्शनास आणून दिली.

निरंजन संत म्हणाले, काळ्या रंगाचे पिगमेंट अबसेन्ट असतात. तो वेगळा वगैरे काही नाही. असं बरेचदा निसर्गात दिसून येतं. पांढरी हरणं दिसतात,पांढरे वाघ असतात,तसाच हा एक प्रकार आहे, त्यामध्ये दुर्मिळ असं काही नाही.White crow

आश्चर्य असं काही नाही, एकवेळ दुर्मिळ म्हणता येईल पण आश्चर्य नाही. हा पिगमेंट चा अभाव आहे.रंगदोष आहे. आपण माणसातील रंग फरक बघा ना, तसाच हा पक्षातील त्वचेच्या रंगातला दोष आहे.असे त्यांनी सांगितले आहे.

तो पांढरा असला तरी कावळाच आहे यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.